नाशिक रोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक रोड परिसरातील तंत्रशुद्ध मॅरेथॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या विशो फिटनेस मंत्रा आयोजित “नाशिक रोड मॅरेथॉन-रन फॉर फन”च्या तिसऱ्या आवृत्तीत दिनकर महाले, पाशा लोभी, मुकेश मिश्रा, नितु सिंग, भगीरथ गायकवाड, नेहा भुसारे, रवींद्र आहेर, सी. व्ही. मेघा, वसंत आहेर आणि ललिता सेठी यांनी आपापल्या वयोगटात श्रेणीतील प्रथम क्रमांक मिळवत मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. मॅरेथॉनमध्ये ११०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने “नाशिक रोड मॅरेथॉन- रन फॉर फन” चे आयोजन केले जाते. विशो फिटनेस मंत्रा ह्या फिटनेस आणि मॅरेथॉन रनिंग ट्रेनिंग देणाऱ्या संस्थेने मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. रविवारी (१८ फेब्रुवारी) रोजी पहाटे साडेपाचला मनपा शाळा क्रमांक १२५ ग्राउंड, नाशिक रोड येथून मॅरेथॉनला सुरुवात होऊन मुक्तिधाम मंदिर, अनुराधा टॉकीज, देवळालीगाव, लॅम रोड येथून मार्गक्रमण करून मनपा शाळा क्रमांक १२५ ग्राउंड येथे समारोप झाला.
मॅरेथॉनमधील स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच त्यांना सन्मानित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेविका संगीता गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विविध शासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्था असलेल्या नाशिक रोड परिसराला स्वतःची ओळख आहे. अशा मॅरेथॉनच्या आयोजनामुळे नाशिक रोडच्या मानात आणखी भर पडणार असल्याचा विश्वास या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला. आयोजक विशाल मोटकरी संचालक विषो फिटनेस मंत्रा यांनी मॅरेथॉनमागील उद्दिष्ट विशद करत व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. मॅरेथॉनमधील फन रन प्रकारामध्ये ५५० स्पर्धक, ५ किमी प्रकारात ३५० स्पर्धक आणि १० किमी प्रकारात २२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ह्या प्रसंगी – एस एम बी टी कॉलेज, जयराम हॉस्पिटल, गणेश व्हॅली सोसायटी, आनंद जॉगर्स ग्रुप, हरी विहार, गजानन पार्क, शाम ग्लोरी आणि एम जि ग्रुप ने सांघिक फन रन मध्ये विशेष स्थान मिळविले आणि आकर्षण ठरले .
विजेत्यांची नावे अशी ः
५ किमी १२ ते ४० पुरुष ः प्रथम- भगीरथ गायकवाड , द्वितीय- विजय सोनावणे, तृतीय- यशराज पांगरे
५ किमी १२ ते ४० महिला ः प्रथम- नेहा भुसारे , द्वितीय- मनीषा सोनावणे, तृतीय- तेजस्वी
५ किमी ४०+ पुरुष ः प्रथम- रवींद्र आहेर, द्वितीय- सुनील पोरजे, तृतीय- सुधाकर सिंग
५ किमी ४०+ महिला ः प्रथम- सी व्ही मेघा , द्वितीय- छाया अहिरराव, तृतीय- स्नेहल डोरले
१० किमी १८ ते ४० पुरुष ः प्रथम- दिनकर महाले, द्वितीय- गणेश बोराडे , तृतीय- राजू देवरे
१० किमी १८ ते ४० महिला ः प्रथम- पाशा लोभी, द्वितीय- गायत्री महाले, तृतीय- निवृत्ता बोरसे
१० किमी ४०+ पुरुष ः प्रथम- मुकेश मिश्रा , द्वितीय- सावळीराम शिंदे , तृतीय- प्रवीण जडेजा
१० किमी ४०+ महिला ः प्रथम- नितु सिंग, द्वितीय- लीना मोरे , तृतीय- विद्यावर्धनी उशीर
३ किमी वरिष्ठ नागरिक पुरुष ः प्रथम- वसंत आहेर, द्वितीय- सूर्यकांत भोसले, तृतीय- तानाजी भोर
३ किमी वरिष्ठ नागरिक महिला ः प्रथम– ललिता सेठी, द्वितीय- तसणीम, तृतीय- सुलोचना मूर्ती