नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा व महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शिवस्मारक, जिल्हा न्यायालयासमोर, जुने सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, महानगरपालिका उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, विजयकुमार मुंडे तहसिलदार, सामान्य प्रशासन विभाग मंजुषा घाटगे, यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपलिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासही माल्यार्पण केले. यावेळी सामुहिक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच नाशिक ग्रामीण पोलीस बँण्ड पथकामार्फत महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने म.प्र.वि. संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय रक्तपेढी मार्फत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.