नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर वाडिव-हे येथे नायरा पंपा जवळ रिक्षा पलटी झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले. रविवारी रात्री ९ वाजता हा अपघात झाला. या अपघातात भैय्यासाहेब पुंजाराम पाटिल (३४), राहुल विठ्ठल पाटील (२८), रोहिनी भैय्यासाहेब पाटील (२५), कार्तिकी भैय्यासाहेब पाटील (८), भुषण अविनाश बोरसे (४२) रा. कल्याण मुंबई हे जखमी झाले.
नाशिकहून मुंबई कडे जाणा-या अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर हे वाहन पसार झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जणांना मुका मार लागला.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.