सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आकांक्षीत तालुका सुरगाणा मधील कुपोषण कमी करण्यासाठी योजना पशुसंवर्धन विभागामार्फत २५+३ कोंबडीचे तलंगा गट वाटप करण्यात आले. पंचायत समिती सुरगाणा व बारहे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कुपोषित बालकांच्या पालकांना आमदार नितीनपवार यांच्या हस्ते हे कोंबड्याचे वाटप करण्यात आले.
यामध्ये २५ मादी कोंबड्या व तीन नरकोंबडे व त्यासोबत कोंबड्याचे खाद्य वाटप करण्यात आले सदर योजना जिल्हा परिषदच्या सेस फंडातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सुरगाणा हा आकांक्षीत तालुका असून सुरगाणा मध्ये कुपोषणाचे प्रमाण आहे. हे कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय यांच्या समन्वयाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेचे उद्दिष्ट कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्याचे वाटप करून त्यातून मिळणारे अंडी द्वारा लाभार्थी यांना प्रथिनेयुक्त आहार मिळावा व उरलेल्या अंड्यातून त्यांना रोजगार मिळून आर्थिक लाभ व्हावा हे उद्दिष्ट ठेवून सदरची योजना राबविण्यात येत आहे. या यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक आमदार नितीन पवार यांनी लाभार्थी यांना सदर योजनेचा योग्य लाभ घेऊन अधिकाधिक कोंबडी व अंडी उत्पादन करावे. कोंबड्याचे योग्य संगोपन करावे व अधिकाधिक उत्पादन करावे व त्यातून पिल्लांची पैदास करून कुक्कुटपालन व्यवसाय कसा वाढीस लागेल याबाबत लाभार्थी यांनी प्रयत्न करावे. कोंबडी कापुन न खाता व विकून न टाकता अंडी चे उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी या नावीन्यपूर्ण योजनेबद्दल लाभार्थी यांना अधिक माहिती दिली. यावेळेस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार व अर्जुन झरेकर सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पोद्दार CM फेल्लो प्रज्ञा कुर्डुकर पशुसंवर्धन विभागाचे सर्व पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी पंचायत समितीचे सर्व खाते प्रमुख पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.