मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी गेल्या अनेक वर्ष मागणी होत होती.
आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून त्याला यश आले, शिवजछत्रपती शिवाजी महाराजांचा मेघ डबरीत बसवलेला हा पुतळा असून त्याचा दिमाखदार भव्य लोकार्पण सोहळा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर आतिष बाजी करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षा पासूनची मागणी मागणी आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याने पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह होता.