नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुतोंड्या मारूती जवळ, रामतीर्थ, गंगाघाट, पंचवटी, नाशिक येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत विविध ज्ञांतीच्या हस्ते गंगा गोदावरीपूजन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती करण्यात येणार असून नाशिककरानी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामतीर्थ गोदावरी समितीचे प्रवक्ते नरसिंहकृपा दास व सह प्रवक्ते राजेंद्र फड यांनी केले आहे.
रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात प्रवक्ते नरसिंह कृपा दास व सहप्रवक्ते राजेंद्र फड यांनी म्हटले आहे की, दक्षिण भारतातील प्राचीन गंगा असलेल्या जीवनदायीनी गंगा गोदावरीचे पवित्र योगदान देव देवता, ऋषी, महर्षी, मानव जीवन, संस्कृती संबंधित क्षेत्रे आणि निसर्ग यांच्या आयुष्यात मोलाचे आहे. तिच्या तीर्थरूप जलाचा अभिषेक पुण्यप्राप्ती करून देतो. कुंभपर्वातील देवांचे वसतीस्थान असलेली श्री गंगा गोदावरी नदी आपल्यासाठी वंदनीय आहे. अशा पवित्र गोदामातेच्या स्मृती – धर्मशास्त्र, पुराण, इतिहास व काव्य ग्रंथात सर्वत्र विखुरलेल्या व रूजलेल्या आहेत. त्या पुढच्या पिढीत संक्रमित व्हाव्यात व मानवी संस्कृतीत अधिक सुसंस्कृतता, कला व सभ्यता निर्माण व्हावी यासाठी सर्वांच्या साक्षीने रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुतोंड्या मारूती जवळ, रामतीर्थ, गंगाघाट, पंचवटी, नाशिक येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत समाजातील वेग वेगळ्या न्याती समाज सहभागी होऊन यांच्या हस्ते व क्षेत्रस्त पुरोहितांच्या पौरोहीत्या खाली गंगा गोदावरी जन्मोत्सव पुजन संपन्न होईल. तसेच सायंकाळी ५.३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे
थोर सन्यासी डॉ. सखा सुमंत महाराज यांचे हस्ते आरतीचे उदघाटण होईल. त्यानंतर धर्मगुरु स्वामी अमृताश्रम महाराज हे मार्गदर्शन करतील तसेच विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय मंत्री दादा वेदक हे उपस्थित रहातील. तसेच या सोहळ्याचे आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहीरे या स्वागत प्रमुख असणार आहे. या सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या पुण्य प्रसाद देणाऱ्या पूजन व आरतीस आपण सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने प्रवक्ते नरसिंहकृपा दास व सहप्रवक्ते राजेंद्र फड यांनी केले आहे.