नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीएमए विद्यार्थी दोन दिवसीय संमेलन १४ वर्षाचा प्रदीर्घ काळानंतर नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील विविध शहरातील विद्यार्थीनी सहभाग नोंदविलेल्या या निमित्ताने (दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस ऑफ इंडिया) सीएमए लोगोची सर्वात जास्त विद्यार्थ्यांद्वारे प्रतिकृती तयार करण्यात आली असून जागतिक स्तरावर (वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन) मध्ये नोंद करण्यात आली असल्याची माहिती नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए आरिफखान मन्सूरी यांनी दिली.*
आयसीएमएआय (दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस ऑफ इंडिया) च्या वतीने दि. १७ व १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सीएमए विद्यार्थ्यां करिता दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन नाशिक मधील गुरुदक्षिणा ऑडिटरियम येथे करण्यात आले होते. या दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी त्याच बरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास व्हावा या उद्देशाने प्रश्नमंजुषा, पेपर सादरीकरण, संसदीय कामकाज व विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांवरील ताणतणाव दूर होऊन मनोरंजन व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल सत्राने सर्वात करण्यात आली प्रमुख वक्ते कर्नल आर एन गोखले यांनी कारगिलवार मध्ये सैन्याला आत्मविश्वास व प्रेरणा देत युद्धात कशा प्रकारे विजय मिळवला याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रभावित करत त्यांचा उत्साह वाढवला. जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आणि सहज शक्य असेही काहीच नाही म्हणूनच यशस्वी होण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द व चिकाटी तुमच्याकडे पाहिजे यासोबतच प्रामाणिक पणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते तर आणि तरच तुम्हाला यश संपादन करता येईल. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. प्रयत्न करत असताना कधी कधी अपयश येते परंतु तुम्ही कुठेही न डगमगता आत्मविश्वासाने पुन्हा उठा आणि अपयशाचा सामना संघर्षाने करा मग निश्चितच एक ना एक दिवस यश तुम्हाला मिळेल गर्वाने तुमची मान उंचावेल आणि समाजात तुमचा नावलौकिक वाढेल अशा प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना मोटिव्हेट केले.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्डस्, कॉस्टिंग मेथड अँड टेक्निक्स, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट ब्रँड्स अँड लोगोज, जीएसटी या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.त्याच बरोबर अभ्यासक्रमावर आधारित जीएसटी, फास्ट ऑडिट, ए आय व क्रिप्टो, विकसीत भारत २०४७ अशा विविध विषयांवर विद्यार्थांनी संशोधन पेपर सादरीकरण केले.
यानंतर विद्यार्थांसाठी मॉक संसदीय कामकाज या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल सातभाई, श्रावणी शुक्ला, जयेश दायमा, प्रणव सूर्यवंशी, वेदिका महाले तर आभार प्रदर्शन नाशिक चॅप्टर चे सचिव सीएमए धनंजय जाधव यांनी केले. संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता अनेक स्वयंसेवक विद्यार्थी, सीएमए सदस्य, याच बरोबर नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए आरिफखान मन्सूरी, उपाध्यक्ष सीएमए अमित जाधव, सचिव सीएमए धनंजय जाधव,
खजिनदार सीएमए मैथिली मालपुरे, कार्यकारणी पदाधिकारी सीएमए कैलास शिंदे, सीएमए मयूर निकम, सीएमए नवनाथ गांगुर्डे, सीएमए संतोष ब्राह्मणकर, सीएमए प्रकाश राजपूत व विद्यार्थी प्रतिनिधी सुयोग मालपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.