इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकोटमध्ये येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. या विजयामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे.
आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालने या डावात नाबाद द्विशतक झळकावलं. त्याच्या या तडाखेबंद खेळीत १२ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. सरफराज खानने त्याला चांगली साथ देत पदार्पणाच्या सामन्यात सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकाववे. त्याने ६८ धावा केल्या. शुभमन गिलचे शतक हुकले. त्याने ९१ धावा केल्या.
पहिल्या डावातल्या १२६ धावांच्या आघाडीमुळे भारताची एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इग्लंडचा संपूर्ण संघ १२२ धावात गारद झाला. रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले. पहिल्या डावात त्याने ११२ धावा केल्या होत्या, आणि इग्लंडचे २ गडी बाद केले होते. त्यामुळे तो या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.