मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)चे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दर्जेदार शिक्षण उपलब्ध नसलेल्या गटांच्या मदत आणि सक्षमीकरणासाठी सक्षमीकरणासाठी २०२३-२०२४ च्या शैक्षणिक सत्रामध्ये ५१,००० विद्यार्थ्यांना आपल्या काही सशुल्क बॅचेससाठीची फी माफ केली आहे. या फी माफीच्या रूपाने दिल्या गेलेल्या योगदानाचे एकूण मूल्य १७ कोटी रूपयांहून अधिक आहे.
वर्ष २०२० मधील आपल्या स्थापनेपासून फिजिक्सवाला उच्च दर्जाचे आणि परवड्याजोगे अभ्यासक्रम पुरविण्याचे, देशाच्या अगदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यासाठीही व्यापक पातळीवर शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचे काम समर्पित भावनेने करत आहे. आपल्या परडण्याजोग्या मूल्यरचनेच्या माध्यमातून उच्च दर्जाचा कन्टेन्ट असलेल्या बॅचेस रु. ३,००० आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये असलेल्या बॅचेस रु. ४,००० किंमतीला उपलब्ध करून देत पीडब्ल्यूने बाजारपेठेमध्ये खळबळ निर्माण केली. या प्रयत्नांनंतरही विद्यार्थ्यांचा एका मोठ्या समूहाला हे अभ्यासक्रमही परवडत नसल्याचे दिसून आल्याने पीडब्ल्यूचे संस्थापक अलख पांडे यांना संधींच्या बाबतीत विद्यार्थ्यांना एक समन्यायी मंच मिळवून देणाऱ्या या उपक्रमाची घोषणा करण्याची कल्पना सुचली.
पीडब्ल्यूचे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे म्हणाले, “हा उपक्रम प्रतिकूल पार्श्वभूमी लाभलेल्या आणि तरीही आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची आस बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना प्रोत्साहन देणे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आर्थिक मर्यादांमुळे त्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जाणार नाही हा विश्वास त्यांना देणे हे आमचे लक्ष्य आहे. संपूर्ण भारतभरात ही क्रांतीकारी चळवळ पोहोचवण्याप्रती आमची बांधिलकी यापुढेही अढळ राहील.”
ही फी माफी ड्रॉपर्स आणि इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या नीट अल्टिमेट क्रॅश कोर्स २.०, जेईई अल्टिमेट क्रॅश कोर्स २.०, अर्जुन जेईई आणि नीट ४.०, इयत्ता १२वी सायन्ससाठीचा बोर्ड बूस्टर, इयत्ता १०वी साठीचे बोर्ड बूस्टर, नीट हिंदी क्रॅश कोर्स, इयत्ता ९वीसाठीचा नीव फास्ट ट्रॅक, इयत्ता ८वी साठीच्या उमंग २.० आणि इयत्ता ११वी आणि १२वी साठी कॉमर्स एक्झाम बूस्टर या अभ्यासक्रमांसाठी तसेच इयत्ता ११वी आणि १२वीच्या आर्टस् अभ्यासक्रमांसाठी देण्यात आली.