इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत दोन दिवसांत आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, की उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आदर्श पद्धतीने साजरी करा. आंदोलनाची दिशा वीस तारखेनंतर ठरवणार आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना त्रास होऊ देऊ नका. ज्यांची नोंद मिळाली, त्या नोंदीच्या आधारे सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावे. सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार करून जरांगे पाटील म्हणाले, की मराठे ओबीसीमध्येच आहेत. सहा कोटी मराठ्यांचे ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे,असे मागणे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या नोंदी मिळल्या नाहीत, त्यांना नवे आरक्षणाची भाषा गैरसमज करणारी आहे. मराठे ओबीसीमध्ये आहे असे सांगून सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.