इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारने हटवली आहे. कांदा निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आणि कांदा व्यारपाऱ्यांतील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा फायदा होईल.
कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ३१ मार्च २०२४ पर्यंत हा आदेश असताना ही मुदत संपण्यापूर्वीच निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचे उत्पादन लक्षात घेऊन सरकारने निर्यातीला मान्यता दिली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने तीन लाख टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. बांगला देशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यात करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचे भाव १०० रुपये किलोवर पोहोचल्याने कांदा निर्यातबंदी करण्यात आली होती.