इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या उमराणे येथील अवघ्या दीड वर्ष वयाच्या ‘शिवार्थ देवरे’ याने शिवनेरी सर केले. शिवार्थ देवरे (उर्फ रायबा) ला घरात खेळतांना, बागडतांना खेळणी नको असतात. रायबाला हवे असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि मूर्ती. याच प्रेमापोटी त्याने हा किल्ला त्याने सर करत सर्वांचे लक्ष वेधले….
६ जून २०२२ रोजी शिवराज्यभिषेक दिनांच्या मूहूर्तावर जन्मलेला शिवार्थराजे स्नेहल सचिन देवरे (उर्फ रायबा) हा मुळचा नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे येथील. या बालकाला लहानपणापासूनच शिवरायांबाबत विशेष प्रेम असल्याचे रायबाचे छत्रपतींविषयी असलेली विशेष ओढ लक्षात घेता वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांन रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला.
यासाठी लागणाऱ्या सर्व कागदोपत्री परवानगींची त्यांनी पुर्तता केली. काही डॉक्टरांना सोबत घेतले. यापूर्वी काही दिवस रायबाचा चालण्याचा सराव करुन घेण्यात आला. त्यानुसार आई, वडील, डॉक्टर तसेच काहीं जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने शिवनेरीवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल ६ तास २७ मिनीटाता हा चिमुकला शिवनेरीवर पोहचला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याठिकाणी असलेल्या विशेष पथकाने देखील त्याचे स्वागत करीत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेली महल उघडून दिला. रायबाने देखील मोठ्या अदबीने आतमध्ये प्रवेश करीत त्या जागेला मानाचा मुजरा केला.
परतीचा प्रवास एक तास ३७ मिनीटात रायबाने पूर्ण केला. आजच्या या स्मार्ट युगातल्या लहान मुलांना देखील स्मार्ट फोनच खेळण्यासाठी हवा असतांना या अवघ्या दीड वर्षाच्या रायबाला मात्र छत्रपतींची प्रतिमा, मूर्ती हवी असते, हे देखील कौतुकास्पद आहे… रायबाने शिवनेरी सर केल्याने त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकजण त्याला भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत.