इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत अनुसूचित जमाती – पेसा क्षेत्र शिक्षक पदभरती 2023 करिता, शासन स्तरावरून प्राप्त यादीतील गुणानुक्रमानुसार उमेवारांच्या कागदपत्र पडताळणीचे कामकाज पूर्ण झाले आहे. कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार विविध टप्प्यावर उमेदवारांना पुरेसा वेळ व संधी देण्यात येवून, तात्पुरत्या स्वरुपात पात्र ठरलेल्या उमेदवारांची गट निहाय यादी तयार करण्यात आली आहे.
सदर यादी नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अभियोग्यता धारक सर्व उमेदवारांनी यादीचे अवलोकन करून, एखाद्या उमेदवाराच्या पात्रतेबाबत काहीएक तक्रार, हरकत अगर आक्षेप असल्यास,दोन कार्यालयीन दिवसात आपले लेखी निवेदन पुराव्यासह जि.प.कार्यालयास सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
अंतिम निवड यादी व समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच जाहिर करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक नितीन बच्छाव यांनी सांगितले.