नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक रोड विभागा अंतर्गत जैविक कचरा विलगीकरण न करता घंटागाडीत देतांना आढळुन आल्याने रेडीअंट प्लस हॉस्पिटल, ॲशुयअर केअर प्लस हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ३० हजार तर व्यावसायिक कचरा वर्गीकरण न केल्याने नाशिकरोड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल गुरुकृपा हॉस्पिटल यांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे एकूण १० हजार असा एकुण ४० हजार दंड करण्यात आला.
डॉ.अशोक करंजकर मनपाआयुक्त तथा प्रशासक ,डॉ. आवेश पलोड संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या आदेशान्वये जवाहरलाल टिळे विभागीय अधिकारी नाशिकरोड विभाग तसेच अशोक साळवे विभागीय स्वच्छता निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज १७/०२/२०२४ रोजी ही कारवाई करण्यात आली.
या कारनाईच्या वेळी स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, तेजस गायकवाड, विशाल घोलप, राहुल तासंबड, प्रवीण बिऱ्हाडे, स्वच्छता मुकादम- जनार्दन घंटे , रंजित हंसराज, सुनिल वाघ आदी उपस्थित होते.