जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १५ वित्त आयोगाच्या शिफारशी मधून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. सदर मंजुरीचे रक्कमेतून ५० टक्के प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी करणारे यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामसेवक हेमंत जोशी व ऑपरेटर सुधाकर कोळी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांवच्या जाळ्यात अडकले आहे.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांचे चुंचाळे ता. यावल गावी वडीलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये १५ वित्त आयोगाच्या शिफारशी मधुन गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. सदर मंजुरीचे रक्कमे तून ५० टक्के प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक यांनी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी १६ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता ग्रामसेवक यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानतर आज १७ फेब्रुवारी रोजी ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी चुंचाळे ग्रामपंचायत येथे एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर यावल पोलीस स्टेशन ता. यावल जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ऑपेरटर कोळीला ताब्यात घेण्यात आले असून ग्रामसेवकाचा शोध सुरु आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय-46 रा. चुंचाळे ता. यावल जि.जळगांव
*आलोसे-1. हेमंत कमलाकर जोशी , वय वर्ष व्यवसाय नोकरी , ग्रामसेवक चुंचाळे ता. यावल रा. साकळी ता. यावल जि.जळगांव
2. सुधाकर धुळकू कोळी वय 35 रा. चुंचाळे ता. यावल ग्रामपंचायत ऑपरेटर
*लाचेची मागणी- 1,00,000/-
*लाच स्विकारली- 1,00,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 1,00,000/-रुपये
*लालेची मागणी -लदि.16/02/2024
*लाच स्विकारली – दि.17/02/2024
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे चुंचाळे ता. यावल गावी वडीलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशी मधुन गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. सदर मंजुरीचे रक्कमे तून 50 % प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी आलोसे ग्रामसेवक यांनी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि.16/02/2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानतर आज दिनांक 17/02/2024 रोजी आलोसे ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने आरोपी क्र 2 यांनी चुंचाळे ग्रामपंचायत येथे एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर यावल पोलीस स्टेशन ता. यावल जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी क्रमांक 2 यांस ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे क्रमांक 1 यांचा शोध घेत आहोत.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा पर्यवेक्षक अधिकारी– श्री.सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव
*सापळा व तपास अधिकारी – श्री. अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक – सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोना सुनिल वानखेडे
*कारवाई मदत पथक– एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी,