इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमिर खानच्या प्रसिध्द अशा दंगल चित्रपटात बबीता हे पात्र रंगणवारी सुहानी भटनागर हिचे निधन झाले आहे. १९ वर्षीय सुहानीला चुकीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे तीचे निधन झाल्याचे बोलले जात आहे. बालकलाकार म्हणून तीचे दंगल चित्रपट रिलीज झाल्यानंतर कौतुक झाले होते. तीच्यावर शनिवारी फरीदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
या मृत्यूबाबत मिळालेली माहिती अशी की, तीचे पाय फॅक्चर झाले होते. त्यावर ती उपचार घेत होती. या उपचारा दरम्यान घेतलेल्या औषधांचा साइड इफेक्ट झाल्यामुळे बॅाडीत फ्लूइड बनू लागला. त्या कारणाने तीचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून ती दिल्लीतील एम्स हॅास्पिटलमध्ये उपचार घेत होती.
तीच्या मृत्यूनंतर आमिर खान प्रॅाडक्शनने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. तिची आई पूजाजी आणि संपूर्ण कुटुंबाला आमच्या मनःपूर्वक संवेदना.. एवढी प्रतिभावान तरुणी, अशी टीम प्लेयर, दंगल सुहानीशिवाय अपूर्ण राहिले असते. सुहानी, तू नेहमी आमच्या हृदयात एक तारा राहशील.