इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः एकीकडे राज्यसभा उमेदवारीची हुलगावनी मिळाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची ६१ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने नोटीस बजावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा कारखाना बंद आहे. या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम न भरल्यानेच नोटीस देण्यात आली आहे.
पंकजा या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम कारखान्याने न भरल्याने पीएफ कार्यालयाने या कारखान्याच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. विविध कारणाने हा कारखाना बंद आहे. त्यानंतर ही नोटीस आली आहे.
यापूर्वी या कारखान्याला जीएसटीची नोटीस आली होती. कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा भारावून गेल्या होत्या.