इंडिया दर्पण ऑलनाईन डेस्क
भोपाळः माजी मुख्यमंत्री कमलनाथ व त्यांचे पुत्र खा. नकुल नाथ हे दिल्लीला रवाना झाले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. खा. नकुल नाथ यांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काँग्रेस पक्षाचे नाव आणि लोगो काढून टाकला आहे. त्याऐवजी त्यांनी ‘संसद सदस्य, छिंदवाडा (मध्य प्रदेश)’ असे लिहिल्यानंतर या चर्चेला जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर हे दोन्ही दिल्लीला रवाना झाले.
कमलनाथ यांनी छिंदवाडा दौरा रद्द करण्यात केला. त्यानंतर ते अचानक मुलगा नकुल नाथसोबत दिल्लीला रवाना झाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. नकुल नाथ यांच्या पक्षाचे नाव आणि लोगो गायब आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दिग्विजय सिंह यांना कमलनाथ दिल्लीला जाण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. दिग्विजय सिंह म्हणाले, की मी काल रात्री कमलनाथ यांच्याशी बोललो होतो. ते छिंदवाडा येथे आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळींदरम्यान दिग्विजय सिंह म्हणाले की, कमलनाथ यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये घालवले आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून ते पक्षाशी जोडले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही गमवावे लागले होते.
मध्य प्रदेशातील दिग्गज नेत्यांमध्ये कमलनाथ यांची गणना होते. १९८० ते २०१४ पर्यंत ते लोकसभेचे खासदार राहिले आहेत. नऊ वेळा खासदारकीची निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते. २०१८ मध्ये ते आमदार झाले आणि त्यासोबत त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; मात्र, त्यांचे सरकार कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पडले. नकलुनाथ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत छिंदवाडा येथून विजय झाले होते.