नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामगार कृती समिती व सिटुच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्हाभरातून शेतकरी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा मोर्चा गोलक्लब मैदानापासून सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
या मोर्चात जिल्ह्यातील कामगार व शेतकरी वर्गाच्या प्रलंबित मागण्या तसेच कामगार विरोधी भाजपप्रणीत मोदी सरकारन कामगार विरोधी चार श्रमसंहिता लागू केल्या असून त्या रद्द कराव्यात. दिल्ली येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावे व एमपीसी चा कायदा मंजूर करावा. कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा व २६ हजार रुपये किमान वेतन द्या,
बंद कारखान्यातील कामगारांची देणी त्वरित द्या, आशा कर्मचाऱ्यांचे शासनाने ठरवल्याप्रमाणे जीआर काढून मानधन वाढ द्या,
या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या मोर्चास मार्गदर्शन म्हणून कामगार कृती समिती व सीटुचे नेते कॉ डॉक्टर डी एल कराड तसेच कामगार कृती समितीचे नेते कॉ अरुण आहेर कॉ राजू देसले, कॉ महादेव खुडे, कॉ मोहन देशपांडे, कॉ बाळासाहेब कासार, कॉ दिनेश वाघ यांनी केले मोर्चाप्रसंगी उपस्थित कॉ श्यामसुंदर जोशी कॉ आनंद गांगुर्डे, कॉ तानाजी जायभावे, कॉ सुनील मालुसरे, कॉ आप्पासाहेब वटाणे ,सीटुचे जिल्हा अध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे, कॉ सचिन मालेगावकर, कॉ तुकाराम सोनजे, कॉ अरविंद शहापुरे, कॉ आत्माराम डावरे, कॉ संतोष काकडे, कॉ संतोष कुलकर्णी, कॉ मोहन जाधव, कॉ नागेश दुर्वे, कॉ राहुल गायकवाड, कॉ कल्पनाताई शिंदे, कॉ गौतम कोंगळे, कॉ सतीश खैरनार, कॉ दत्ता राक्षे, कॉ संजय पवार यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.