इंडिया दर्पण वृत्तसेवा
जेजुरी पालखी महामार्गावर मार्गावर खळद बोरावके मळा येथील विहिरीत रिक्षा पडल्याची घटना घडली आहे. चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रिक्षात बसलेल्या दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दांम्पत्याचाही समावेश आहे.
ही रिक्षा विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन मागवून रिक्षा बाहेर काढण्याचे काम सुरु केले. यावेळी पोलिसांना ग्रामस्थही मदत करत आहे. या रिक्षेतील प्रवाशांची नावे अद्याप मिळालेली नाही. या प्रवास करणाऱ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले एक नवविवाहित दांम्पत्याचा मृत्यू झाला आहे.
सोमवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. या रिक्षाचा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे बोलले जात असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नेमके काय कारण हे अद्याप स्पष्ट नाही.