नाशिक : मखमलाबाद रोडवरील लिलावती हॉस्पिटल भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिध्देश चंद्रकांत जंगम (रा.सिध्दीविनायक प्राईड,लिलावती हॉस्पिटल मागे,राहूल चौक) असे मृत युवकाचे नाव आहे. सिध्देश जंगम या युवकाने गुरूवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच वडिल चंद्रकांत जंगम यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास फुलपगारे करीत आहेत.