नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शिकवणी वर्ग (कोचिंग) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्याशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर जनतेची मते मागवली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा ग्राहक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर खुला असून तो पुढील दुव्याद्वारे उपलब्ध आहे:
(https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Public%20Comments%20Letter%202.pdf).
सार्वजनिक टिप्पण्या/सूचना/अभिप्राय मागवले असून 30 दिवसांच्या आत (16 मार्च 2024 पर्यंत) केंद्रीय प्राधिकरणाला ते पुरवले जाऊ शकतात. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सी. सी. पी. ए.) 08 जानेवारी 2024 रोजी शिकवणी वर्ग (कोचिंग) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर संबंधित घटकांशी सल्लामसलत केली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शिकवणी वर्ग (कोचिंग) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणावीत, यावर बैठकीत एकमत झाले.
मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात ‘शिकवणी’ म्हणजे शिकवणी वर्ग, सूचना किंवा शैक्षणिक सहाय्य किंवा शिक्षण कार्यक्रम किंवा कोणत्याही व्यक्तीने दिलेले मार्गदर्शन अशी व्याख्या केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी अटी घालण्यात आल्या आहेत. खालीलपैकी कोणत्याही पद्धती वापरल्या गेल्या असतील तर शिकवणी वर्ग क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमध्ये गुंतलेली आहे असे मानले जाईल:
अभ्यासक्रमाचे नाव (मग ते विनामूल्य असो किंवा सशुल्क) आणि यशस्वी उमेदवाराने निवडलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी किंवा ग्राहकांच्या त्यांच्या सेवा निवडण्याच्या निर्णयावर प्रभाव पाडू शकणारी इतर कोणतीही महत्त्वाची माहिती लपवणे. पडताळणीयोग्य पुरावा न देता कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण, निवडीची संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या क्रमवारीबाबत खोटे दावे करणे.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची दखल न घेता, त्यांच्या यशाचे श्रेय केवळ शिकवणी वर्गाला देऊन फसवे प्रतिनिधित्व करणे . त्यांच्या यशात प्रशिक्षकांच्या सहभागाची व्याप्ती स्पष्टपणे सांगायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये चिंता वाढू शकेल असा तातडीची गरज असल्याचा फसवा भाव किंवा नापास होण्याची भीती निर्माण करणे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा ग्राहकांच्या स्वायत्ततेवर आणि निवडीवर परिणाम करणाऱ्या इतर कोणत्याही पद्धती. शिकवणी वर्ग क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील. शिकवणी वर्ग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हा या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. अशा प्रकारे, एक वर्ग म्हणून ग्राहकांवर परिणाम करणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना रोखण्याचा प्रयत्न ही प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे करतात.
For more information on the new guidelines, visit the link: