शुक्रवार, ऑक्टोबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

त्र्यंबकेश्वर परिसरात विद्युत रोहित्र चोराला ग्रामस्थांच्या मदतीने पकडले

फेब्रुवारी 16, 2024 | 5:20 pm
in स्थानिक बातम्या
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणच्या नाशिक मंडळातील त्र्यंबकेश्वर परिसरातील पहीने गावात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी महावितरणच्या रोहित्राचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयितास ग्रामस्थांच्या सतर्कतेने व मदतीने पकडण्यात आले असून वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयितास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने व सहकार्याने सदर प्रकार उघडकीस आला असून अखंडित वीज पुरवण्यासाठी अशा प्रकारे जागरूक व सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मागील ६ महिन्यात त्रंबकेश्वर परिसरातील महावितरणचे आठ विद्युत रोहित्र चोरीला गेले होते. विद्युत रोहित्र हे वीज पुरवठ्यातील महत्वाचे साधन असल्याने ते चोरीला गेल्यामुळे अखंडित वीज पुरवठा करण्यास महावितरणला अडथळा निर्माण होऊन यामुळे आर्थिक फटका सुद्धा बसला होता आणि ग्रामस्थांना सुद्धा अखंडितपणे वीज पुरवठा मिळण्यास अडथळा झाला होता. सदर चोरीबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये महावितरणकडून फिर्याद सुध्दा दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने महावितरण आणि पर्यायाने ग्रामस्थांना सुद्धा याचा त्रास होत होता.

यासंदर्भात संबधित महावितरणच्या नाशिक ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून सर्वांच्या सहकार्याने चोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ संबंधीत कक्ष अभियंता किंवा जनमित्र यांना माहिती द्यावी आणि तात्काळ रोहित्रकेंद्राची स्थळ पाहणी करण्यास ग्राहकांना कळविण्यात आले. त्यानुसार दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी त्रंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील विद्युत रोहित्रावरील वीज पुरवठा बंद झाल्यावर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जनमित्र व कक्ष अभियंता यांना कळविले आणि सोबतच रोहित्र केंद्राची पाहणी केली असता वीज रोहित्राचे साहित्य चोरणारी संशयित टोळी रोहित्राजवळ आढळून आली. त्यावेळी एक संशयितास ग्रामस्थांनी पकडले मात्र टोळीतील इतर दोन संशयित पसार झाले. त्याच्याकडे वीज रोहित्र व तार तोडण्याचे व चोरून नेण्याचे साहित्य यावेळी आढळून आले.

सदर घटनेची तात्काळ वाडीवर्हे पोलीस यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी येऊन तात्काळ संशयितास अटक केली. त्रंबकेश्वर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता महेश जगताप यांच्या तक्रारीवरून वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये संशयित शिवाजी बंडू बोडके याचे विरुद्ध कलम भादंवि ३७९ व ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरणच्या विद्युत यंत्रणेतील साहित्य चोरी करताना वा नेताना आढळ्यास अशा प्रकारे जागरूक व सतर्क राहून ग्राहकांनी कळविण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवैध बनावट मद्य कारखान्या विरोधात धडक कारवाई; ४६ लाखापेक्षा अधिक रुपयाचा मु्द्देमाल जप्त

Next Post

कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती…केंद्र सरकारने उचलले हे पाऊल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Untitled 58

कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती…केंद्र सरकारने उचलले हे पाऊल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011