इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्रासदायक/प्रचारात्मक किंवा अनाहूत व्यावसायिक कॉल्स संदर्भात ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने एक समिती स्थापन केली आहे. यात दूरसंचाराशी संबंधित उद्योग तसेच दूरसंचार विभाग, वित्तीय सेवा विभाग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक , विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, , भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, भारतीय सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन, टेलिमार्केटिंग कंपन्या, व्हीसीओ या नियामक संस्थामधील सदस्यांचा समावेश आहे.
ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, विभागाने 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्रासदायक/प्रचारात्मक /अनाहूत व्यावसायिक कॉलशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. बैठकीत, त्रासदायक/प्रचारात्मक /अनाहूत व्यावसायिक कॉल्सशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली.असे कॉल्स केवळ वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत नाहीत तर ग्राहकांच्या अधिकारांचेही उल्लंघन करतात हे यावेळी निदर्शनाला आले. असे बहुतेक कॉल्स वित्तीय सेवा क्षेत्राचे असतात आणि त्यानंतर बांधकाम क्षेत्राचा क्रमांक लागतो.स्पॅम कॉलर आता इंटरनेट कॉलकडे वळत आहेत, विशेषत: व्हॉट्सॲपचा वापर करून ग्राहकांना पॉन्झी योजना, क्रिप्टो गुंतवणूक आणि नोकरीच्या संधी देण्याचे आमिष दाखवत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
स्पॅम संदेश आणि नोंदणीकृत टेलिमार्केटर्सकडून त्रासदायक कॉल्सशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी दूरसंचार विभाग आणि दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आधीच प्रयत्न केले आहेत.टेलीमार्केटर्सना त्यांची व्यावसायिक संस्था, पाठवणाऱ्याचा आयडी आणि एसएमएस टेम्प्लेट्स डीएलटी मंचावरून मिळवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बँकिंग आणि वित्तीय सेवा, बांधकाम क्षेत्र , ई-वाणिज्य मंच आणि इतर व्यावसायिक संस्थांमधील विविध क्षेत्रातील सर्व टेलिमार्केटरना आधीच सूचित केले गेले आहे की त्यांनी त्यांच्या फोन क्रमांकाला 140 क्रमांकाची मालिका जोडावी जेणेकरून ग्राहक कॉलर ओळखू शकेल हे देखील या बैठकीत निदर्शनाला आणून देण्यात आले. हे सदस्यांना कोणत्या प्रकारचे कॉल किंवा मजकूर ते प्राप्त करू इच्छितात यासाठी अधिक नियंत्रणाची सुविधा उपलब्ध करून देते.