नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक – पुणे रस्त्यावर स्पाच्या नावाखाली देहविक्री सुरु असल्याचे माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पासपोर्ट कार्यालयाच्या वर विवा स्पा मध्ये हा देहविक्रीची सुरु होता. या कारवाईत चार तरुणीची सुटका करुन पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यात स्पाचा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहु (२४) व मदतनीस रुपेश कुमार बरार (२४) यांचा समावेश आहे. तर मालक मयुर देव हा फरार आहे.
स्टार झोन मॉल मधील दुसऱ्या मजल्यावर हा व्यवसाय सुरु होता. याबाबत पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपनगर पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यांना या ठिकाणी चार तरुणी मिळुन आल्या. पोलीसांनी तरुणींची सुटका केली तर साहु आणि बरार यांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत उपनगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदी सह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाणे, नाशिक शहर गु.र.क्र. ५४/२०२४ भादवि कलम ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीनंतर छापा
नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्रीमती मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागसंचिन बारी यांनी नाशिक शहरातील महिलांविरुध्द होणारे अपराधावर प्रतिबंधक करण्याचे व अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे वारंवार सुचना देवून मार्गदर्शन केले होते. त्यानंतर गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, स्टार झोन मॉल, दुसरा मजला, पासपोर्ट ऑफीसच्या वरती, नाशिक पुणे रोड, नाशिक रोड नाशिक येथील विवा स्पा नाशिक येथे मसाज सेन्टरच्या नावाखाली मुली ठेवुन वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस ठाण्याचे वपोनि सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोनि गुन्हे बाबासाहेब दुकळे, सपोनि सचिन चौधरी यांनी छापा टाकला.