मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनास सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले.
दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. या याचिकांचा निकाल आता वाचून दाखवला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिलेला आहे. त्याला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.