इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने एसटी कामागारंनी संपाचा इशारा दिला आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच वार्षिक वेतनवाढीच्या मागण्यांबाबत सरकार १५ दिवसांत निर्णय घेणार होते; परंतु आता चार महिने उलटले असले, तरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करण्याचा इशारा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकबाकी आदी मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनांबाबत चर्चा करून दोन महिन्यांत सरकारला अहवाल सादर करण्याचे समितीने मान्य केले होते; मात्र अहवाल सादर झालेला नाही.
या प्रलंबित मागण्यापूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिला. एसटी कामगार संघटनेच्या सदस्यांनी उपोषण सुरू केले. मागण्या पूर्ण न झाल्यास एसटी कर्मचारी संघटनेने ‘स्टेरिंग छोडो’ आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.