इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरमध्ये काँग्रेसची लोकसभा आढावा बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रसचे कार्यकर्तेच एकमेकांना भिडले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा सर्व गोंधळ झाला. महाकाळकर सभागृहाबाहेर यामुळे मोठी गर्दी झाली. नागपूरमध्ये काँग्रेसचे अगोदरच दोन गट आहे. त्यांचा हा वाद पुन्हा उफाळून आला.
काँग्रेसची बैठक सुरू असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि पदाधिकारी नरेंद्र जीचकार यांच्यात वाद झाला. ठाकरे हे भाषण संपवत असतांना जिचकार यांची बाचाबाची झाली. त्यानंतर थेट वादाचे रुपांतर राडामध्ये झाले. शेवटी दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले. अंगावर धावून गेले. यावेळी दोन्ही बाजूच्या पदाधिका-यांना समाजवण्यात आले. पण, या गोंधळानंतर बैठक थांबवण्यात आली. त्यानंतरही हा राडा सुरूच होता.
प्रदेशाध्यक्षां समोर झालेल्या या राड्याची काँग्रेसनेही गंभीर दखल घेतली आहे. आता पदाधिकारी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांना समजवात आहे.