नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नांदूर जत्रा लिंकरोडवरील संजीवणी लॉन्स येथे विवाह सोहळयानिमित्त आलेल्या महिलेची चोरट्यांनी पर्स लंपास केल्याची घटना घडली. या पर्समध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाची कागदपत्र असा सुमारे ४ लाख ७५ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत कुमार शिवाजीराव जाधव (रा.चांदशी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. जाधव दांम्पत्य सोमवारी (दि.१२) रात्री विवाह सोहळयानिमित्त संजवणी लॉन्स येथे गेले होते. श्रीमती जाधव या अन्य नातेवाईक महिलांशी गप्पा मारत असतांना ही घटना घडली.
बाजूच्या खुर्चीवर ठेवलेली त्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या पर्समध्ये रोकडसह सोन्याचे झुबे, मोबाईल, पासपोर्ट व महत्वाची कागदपत्र असा सुमारे ४ लाख ७५ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.