इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणाच्या सहाव्या दिवशी अतिशय चिंताजनक झाली आहे. त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. आज त्यांना महंतांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. प्रकृत्ती चिंताजनक असल्यामुळे आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.
जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला आहे. ‘पाणी घ्या’ ची घोषणाबाजी सुरू आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी उपोषस्थळी येऊन जरांगे यांना पाणी पिण्यासाठी आग्रह धरला. महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पाण्याचा घोटही जात नव्हता.
जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला असून पोटदुखीचाही त्रास सुरू झाला आहे. आज सकाळपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडली. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषणावर ते ठाम आहेत.