लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भुसावळ-इगतपुरी मेमो एक्सप्रेस लासलगाव रेल्वे स्थानकात येताच अचानक दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु झाली. रेल्वे गाडीमधील प्रवाशांना तसेच प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या प्रवासांना नेमके हे दोघे एकमेकांना का मारत आहे हे समजू शकले नाही.
यावेळी कोणीतरी हा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
याबाबत रेल्वे पोलिसांना विचारले असता एक युवक फोनवर बोलत असतांना दुसऱ्या युवकाकडे पाहून बोलत असल्यामुळे गैरसमज झाला. त्यातून हा प्रकार घडल्याचे समजते हे दोघे युवक लासलगाव येथीलच असून याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.