येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांच्या समर्थनार्थ तसेच सगे सोयऱ्यांचा जीआर काढण्याची मुदत संपलेली असून शासनाने त्वरित त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील मराठा समाजाच्या वतीने नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला आहे. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.