नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. ते शिंदे गटात जाणार असल्यचे बोलले जात आहे. याअगोदर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळेस या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. घोलप गेल्या काही दिवसांपासून नाराज आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याच्या ते तयारी होते. पण, ठाकरे गटाने माजी खासदार भानुदास वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे त्यांची नाराजी वाढली. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्री असलेले घोलप यांनी काही महिन्यापूर्वी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा ठाकरे गटाने प्रयत्नही केला. पण, त्यांची नाराजी काही दूर झाली नाही. त्यांना संपर्क प्रमुखपदावरुन हटवल्यामुळे ते नाराज होतेच. आता त्यांनी थेट पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
बबन घोलप हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहे. त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात खासदार हेमंत गोडसे सह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले. आता जर ते शिंदे गटात गेले तर तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे.
घोलप यांनी शिव सैनिक पदाचा राजीनामा देतांना दिले हे कारण
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देतआहे.कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केलेआहे.मला पक्षाने (संघटनेने)जे जे सागींतले,ते प्रामाणीकपणे केले आहे.पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले व मी ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी काढुन टाकले होते. नविन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे. सर्वात महत्वाच म्हणजे एकनिष्ठ शिवसैनीक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधीकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे. नेमक माझं काय चुकलं ते समजल नाही. मी याबाबत दादही मागीतली पण काहीच उत्तर मिळाल नाही.
माझे वकीलीकरणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनीक पदाचा राजीनामा देत आहे.