नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षाचे (८ वी) आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर परिक्षेसाठी इयत्ता ५ वीसाठी ३७ तर इयत्ता ८ वीसाठी ३२ अशा एकूण ६९ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये इयत्ता ५ वीचे एकूण ७९५३ तर इयत्ता ८ वीचे ६४८२ असे एकूण १४४३५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नाशिक शहरातील सर्व एकूण ६९ केंद्रासाठी राखीव सहित ७३ केंद्रसंचलाकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ( ८ वी ) परिक्षेचे नियोजन श्री. बी. टी. पाटील शिक्षणाधिकारी सो, मनपा शिक्षण विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.