इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी तालुक्यातील गौतमी पाटीलचा काही दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी यांनी टीका केली. या टीकेची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा या आता खाजगी कंपनींना देण्यात येत आहे आणि त्यांनी सीएसआर फंडातून शाळा चालवून विकास करावा. आता ज्या कंपन्यांनी शाळा दत्तक घेतल्या त्या शाळांना कोणत्याही पद्धतीचे नाव देण्याचा त्यांना अधिकार नाही.
शाळेतील शासकीय संपत्ती आणि साहित्याचा वापर हा वैयक्तिक कारणासाठी देखील होऊ शकेल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यात एक शाळा मद्यपान करणाऱ्या कंपनीने दत्तक घेऊन शाळेत गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे शासकीय शाळा खाजगी कंपनींना दत्तक द्यायच्या या निर्णयाला देखील आपण विरोध केला पाहिजे.
या सर्व निर्णयांवर आम्ही स्वस्थ न बसता सरकारला या बाबत योग्य तो निर्णय घ्यायला भाग पाडू हे चित्र या राज्यात तयार करायचे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.