सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीत बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक वडझिरे घाटाच्या बाजूला दोन ते तीन एकर क्षेत्रावर पडीक जागेत गवाताला आग लागून वणवा पेटला. या जागेत अनेक कंपन्यांचे स्क्रॅप मटेरियल असल्याने अचानक आग लागली.
ही आग लागल्याचे कळाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर माळेगाव एमआयडीसी फायर ब्रिगेडला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
ही आग भावेश पॉलिमर व नवीन जिंदाल यांच्या बाजूला लागलेली होती. पण, आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे या कंपन्यांवरील धोका टळला.