नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील दिंडोरीरोड व पांडवनगरी भागात राहणा-या दोन तरूणांनी मंगळवारी (दि.१३) गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरीनगर भागात राहणा-या गणेश काशिनाथ शिंदे (२२) या युवकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये लाकडाच्या बल्लीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मोहन मुगले यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.
दुसरी घटना पांडवनगरी भागात घडली. ओमकार किरण उगले (१८ रा.हरिओम फेस,पांडवनगरी) या तरूणाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. अरूणकुमार सिंह यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ढवळे करीत आहेत.