इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य शासनाच्या गृह विभागाने एक जीआर काढल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा जीआर ट्वीट करत त्यात म्हटले आहे की …तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार ‘बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे. गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का??
शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय? गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे.
आता या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देता हे महत्त्वाचे आहे.