नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – महामार्गा वरील द्वारका परिसरातील उड्डाणपूलावर बुटाची लेस अॅक्सीलेटरमध्ये अडकल्याने कार दुभाजकावर आदळून चालकाचा मृत्यू झाला. अश्पाक नजीर शेख (४७ रा.लक्कडकोट येवला) असे मृत कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख सोमवारी (दि.१२) कामानिमित्त शहरात आले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते इको कारमधून (एमएच ४१ व्ही ५४७४) परतीच्या प्रवासास लागले असता हा अपघात झाला. द्वारका चौकात कार उड्डाणपूलावर चढली होती. काही अंतरावरील पिलर नंबर ९६ जवळ चालकाच्या बुटाची मोकळी लेस अॅक्सीलेटर मध्ये अडकल्याने हा अपघात झाला.
अचानक अॅक्सीलेटर दबले गेल्याने चालक शेख यांचे लक्ष विचलीत झाले असता सुसाट सुटलेली कार उड्डाणपूलावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात शेख गंभीर जखमी झाले होते. मुलगा फरीद शेख यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.