इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील यांच्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगेलच संतापले आहे. त्यांनी सोशल मीडिायवर केलेल्या पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला असे म्हटले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी, ‘राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, ’असा इशारा दिला होता. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !