इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसने राज्यसभेसाठी आपल्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनीया गांधी या राजस्थानमधून उमेदवारी दाखल करणार आहे. तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी, बिहारमधून डॅा. अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी ६ जागा आहे. त्यात भाजप ३, शिंदे गट व अजित पवार गटाला २ व काँग्रेसला १ जागेवर सहज जिंकता येणार आहे. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळेस विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
चंद्रकांत हांडोरे यांनी मुंबईतील चेंबूरमधून प्रतिनिधीत्व केले आहे. ते सामाजिक न्याय मंत्री होते. त्याचप्रमाणे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे.