मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षाणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे या मागणी साठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले असून त्यांच्या आदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षणाच्या कायद्यात रुपांतर करावे यामागणीसाठी सकल मराठा समाजा तर्फे नाशिकच्या येवला, मनमाड, नांदगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
याबंद मुळे सकाळपासून गजबजलेले रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून या बंद मधून हॉस्पिटल,मेडिकल व अन्य जीवनावश्य वस्तूंची दुकाने मात्र वगळण्यात आली आहे.
राज्यात असा बंद ठिकठिकाणी आहे. त्यात काही ठिकाणी मात्र या बंदला समीश्र प्रतिसाद आहे. तर काही ठिकाणी कडकडीत बंद आहे.