इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर कॉंग्रेसचे देगलूर व दक्षिण नांदेडचे आमदारदेखील चव्हाण यांना साथ देणार आहेत. ते लवकरच काँग्रेसच्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश करणार आहेत.
देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर तसेच नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे हे काँग्रेसला जय महाराष्ट्र करून हाती कमळ धरणार आहेत. ते चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत.
काँग्रेसच्या तीन मोठ्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पक्ष सोडला आहे. पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. हे तीनही नेते पक्षासोबत एकनिष्ठ होते; परंतु तरीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला.