इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर ‘ईडी’ने केलेरल्या कारवाईविरोधात त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ तारखेला होणार आहे.
सक्तवसुली संचनयालाने काही दिवसांपू्र्वी वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ‘ईडी’ने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्लीला वर्ग केला. आता त्यालाच वानखेडे यांनी आव्हान दिले आहे. हा तपास दिल्लीला वर्ग करणे चुकीचे असल्याचे म्हणणे वानखेडे यांनी मांडले आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले होते. त्यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप झाले. या प्रकरणात ‘ईडी’कडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. आर्यन खान याची सुटका करताना न्यायालयाने ताशेरे ओढले होते. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने छापा टाकला होता.