नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १२ ऑक्टोंबर अखेर ८५ टक्के साठा असला तरी बहुतांश धरणे जवळपास ओव्हरफ्लो झाली आहे. पण, अजूनही १५ टक्के साठा कमीच आहे. गंगापूर धरणाचा साठा १०० टक्के तर समुहात १०० टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, १०४ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ६४ टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड ही आठ धरणे अगोदरच ओव्हरप्लो झाली होती. पण, आता जवळपास २० धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. यात गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा, यासह जवळपास सर्व धरणे आहे. यातील एक दोन धरणाचा साठा ९२ च्या आसपास आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ७१ टक्के तर गिरणा धरणात ५७ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज ३५ व नागासाक्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.
Nashik district condition of dams…