गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘गो-ग्रीन’ मुळे ४१ हजार वीजग्राहकांची ४९ लाखांची वार्षिक बचत…

फेब्रुवारी 13, 2024 | 6:37 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 46

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४१ हजार ४६२ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेत छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर करीत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये या प्रमाणे एकूण ४१ हजार ४६२ ग्राहकांची ४९ लाख ७५ हजार रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे.

नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या संकल्पनेतून परिमंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. सदर पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाईल च्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सदर पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्स वरील क्यूआर कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करावी. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत असून इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात २४ हजार ७७३ आणि अहमदनगर जिल्ह्यात १६ हजार ६८९ अशाप्रकारे एकूण नाशिक परिमंडळात ४१ हजार ४६२ वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. विज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा विज बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तात्काळ घरबसल्या ऑनलाइन द्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे सोबतच ऑनलाईन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते.

वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महा विज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी आणि वीज खर्च कमी करण्यासाठी गो-ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड असे आवाहन महावितरणने केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश हा महाविकास आघाडीला धक्का नाही तर भाजपला..उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

Next Post

अंबड पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचा-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Screenshot 20240213 183927 WhatsApp 1

अंबड पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचा-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011