श्रीरामपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नगर दौ-यावर असलेले उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की चव्हाण भाजपमध्ये आले त्याचा धक्का महाविकास आघाडीला नाही. तर तो धक्का भाजपला आहे. एक भ्रष्टाचारी भाजपात आला आहे हाच तो मोठा धक्का आहे.
यावेळी ते म्हणाले की, मी जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी मैदानात उतरलोय. फक्त तुमचे आशीर्वाद सोबत असू द्या! उद्धव ठाकरे जे बोलतो ते करुन दाखवतो, ह्याची साक्ष द्यायला पंतप्रधान कोस्टल रोडच्या उद्घाटनाला येत आहेत. उद्घाटन कुणी का करेना, ते जनतेसाठी केलेलं काम आहे. ती माझी खाजगी मालमत्ता नाही.
यावेळी ते म्हणाले की, उपरे आपल्या पक्षात घेणं, ही सूज आहे. भाजप सत्तेच्या मस्तीने सुजलाय अशी टीका सुध्दा त्यांनी भाजवर केली. यावेळी त्यांनी शेतक-यांच्या आंदोलनावर बोलतांना म्ङणाले की, आपल्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जातायत, पण त्यांना अडवायला तिथे जणू सैन्य उभं केलंय…