नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हातभट्टीची गावठी दारू विक्री करणा-या विक्रेत्यास गजाआड केले आहे. संशयिताच्या ताब्यातून सुमारे २३ हजार रूपये किमतीची साडे चारशे लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई एक्साईज अ विभाग भरारी पथकाने केली.
शहरात गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहितीवरून रविवारी (दि.११) पंचवटीतील वाघाडीसह संत गाडगे महाराज पूल,कुष्ठधाम शिशूविहार व छत्रपती संभाजी रोड भागात छापेमारी केली. विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली व अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध मोहिम राबवून ही कारवाई केली.
या कारवाईत कैलास विनायक पाटील हा संशयित दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २२ हजार ४०० रूपये किमतीची गावठी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक योगेश सावखेडकर,दुय्यम निरीक्षक प्रविण देशमुख,सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम.बी.पंडीत जवान विरेंद्र वाघ,महेंद्र बोरसे,विजय पवार,राहूल जगताप,मंगलसिंग जाधव,महिला जवान सुनिता महाजन आदींच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक सावखेडकर करीत आहेत.