नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रेल्वे स्थानकावर रनिंगरूम साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप सर्पमित्र विजय बडोदे यांनी पकडला. बुधवारी रात्री ९ वाजता हा साप रनिंग रुममध्ये जातांना दिसला. त्यानंतर सर्पमित्र बडोदे यांच्याशी तातडीने संपर्क करण्यात आला. काही मिनीटातच तेही रेल्वे स्थानकावर आले. त्यानंतर कोब्रा ऑपरेशन सुरु झाले.
इतका मोठा साप लपून बसल्यामुळे त्याला पकडणे अवघड होते. त्यात तो लपून बसल्यामुळे त्याला शोधणेही सोपे नव्हते. पण, बडोदे यांनी रनिंग रुममधील सामान बाजूला करत त्याला शिताफीने पकडले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हा साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप कर्मचा-याला सर्पदंश करणार तितक्यात त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते बाजूला झाले. त्यामुळे कोणतीही घटना घडली नाही. त्यानंतर तो कोठे गेला हे बघितले. त्यानंतर सर्पमित्र बडोदे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हे कोब्रा ऑपरेशन पूर्ण झाले व रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक भयमुक्त झाले.