मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –महाराष्ट्रातील हजारो आशा व गटप्रवर्तक ताईंनी शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा, मानधन वाढीचा शासन निर्णय घ्या यासाठी शहापूर ते मुंबई लॉंग मार्च काढला. ठाणे मध्ये मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन दोन दिवस महामुक्काम केला आणि ११ तारखेपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलनाचा आज चौथा दिवस असून महाराष्ट्रातील कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील आशा गटप्रर्वतक मात्र सरकारच्या शासन निर्णयाची वाट पाहत आहे.
९ तारखेला मुख्यमंत्री साहेबांसोबत वीस मिनिट महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक प्रति समितीचे बैठक झाली बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी येत्या कॅबिनेट मंत्री मंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले त्यात निर्णयाला किमान दहा दिवसाचा वेळ मागितला परंतु महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक अत्यंत संतापलेल्या आहेत कारण तीन महिन्यापूर्वी आंदोलन केलं तेव्हा सरकारच्या शब्दावर घोषणेवर विश्वास ठेवून संप मागे घेतला.
परंतु तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही शासकीय आदेश निघाला नसल्याने आशा व गटप्रवर्तकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. जोपर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार ज्या दिवशी शासन निर्णय आमच्या हातात मिळेल त्या दिवशी आम्ही माघार घेऊन घरी जाणार असा त्यांनी ठाम निर्धार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील आशा आंदोलन करत आहेत…
कॉ.डी.एल कराड, कॉ.एम एच शेख, कॉ. के आर रघु, कॉ. आरमायटी इराणी, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. अर्चना घुगरे कॉ. हनुमंत कोळी कॉ. राजेंद्र साठे कॉ. सिद्धाराम उमराणी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.